भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐके गा हृषीकेशी । जाणोनि तुं विश्वासी । निजगुह्मा तुजपाशी । ठेवणें दिधलें

aike ga hrushikeshi | janoni tun vishvasi | nijaguhma tujapashi | thevanen didhalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐके गा हृषीकेशी । जाणोनि तुं विश्वासी । निजगुह्मा तुजपाशी । ठेवणें दिधलें ॥१॥ आम्हां चाळवोनि विषयासी । थितें बुडवूं पाहासी । क्रियानष्ट होसी तूंचि येक ॥२॥ आमुचें आम्हां देता । तुज कां नये चित्ता । लाजसी तत्त्वतां । भक्ति घेसी ॥३॥ नेतां पंचापाशी । भले नव्हें हृषीकेशीं । मजसी समान होसी । एका जनार्दनीं ॥४॥