भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनिया कानीं अचळीं भराव्या । आणोनियां द्याव्या आम्हापाशीं

aikoniya kanin achalin bharavya | anoniyan dyavya amhapashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकोनिया कानीं अचळीं भराव्या । आणोनियां द्याव्या आम्हापाशीं ॥१॥ शालिवाहन शके बाराशें साठ । प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर ॥२॥ वैशाख वद्य पंचमी सुदीन । गुरुवारीं प्रयाण करी चोखा ॥३॥ चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुळ धर्म देव चोखा माझा ॥४॥ काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति । मीहि आलों व्यक्ति तयासाठीं ॥५॥ माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान । तया कधीं विन्घ पडों नेदीं ॥६॥ नामदेवें अस्थि आणिल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पितांबरीं ॥७॥