भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनि संतकीर्ति । मना जालीसे विश्रांती । नाहीं पुनरावृत्ती । जन्माची तया

aikoni santakirti | mana jalise vishranti | nahin punaravrutti | janmachi taya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकोनि संतकीर्ति । मना जालीसे विश्रांती । नाहीं पुनरावृत्ती । जन्माची तया ॥१॥ धन्य धन्य संतजन । मज केलें वो पावन । विश्रांतीचें स्थान । हृदयीं माझ्या ठसविलें ॥२॥ बहु जाचलों संसारें । बहु जन्म केले फेरे । ते चुकविले सारे । आजी कृपा करुनी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । माझें हरिलें मीपण । तुम्हीं कृपा करुन । अभय वर दिधला ॥४॥