भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनियां भक्तवचनें । देव संतोषलें मनें

aikoniyan bhaktavachanen | dev santoshalen manen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐकोनियां भक्तवचनें । देव संतोषलें मनें ॥१॥ म्हणती आहे नामापासीं । संदेह न धरावा मानसीं ॥२॥ संत बोलिले ते खरें । साचचि मानावें उत्तरें ॥३॥ निळा म्हणे संतोषविलें । कृपावचनीं या विठठलें ॥४॥