भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनियां देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि त्वरित येई वेगीं

aikoniyan dev namyasi bolat | bajar karuni tvarit yei vegin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकोनियां देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि त्वरित येई वेगीं ॥१॥ तुज पाहिल्यावांचून मज नोहे समाधान । नाम्या तुझी आण वाहातसे ॥२॥ लौकरी नामया यावें परतोनी । ऐसें चक्रपाणी बोलतसे ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें बोलोनि सर्वथा । नामा तो तत्त्वतां घरीं आला ॥४॥