भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संत गाती हरीकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥ हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥ वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥१॥ संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥ मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत ॥१॥ घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥ परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥ हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥ बहु दुधड जरी जाली ह्मैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम