भजनी मालिका
← भजनांकडे परत

संचितावांचून । पंथ न चलवे कारण

sanchitavanchun | panth na chalave karan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥ कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥ धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥२॥ तुका म्हणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥