भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें

santancha mahima to bahu durgam | shabdikanche kam nahin yethen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥ बहु दुधड जरी जाली ह्मैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥ तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळों ॥३॥