भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी

sant mage pani nedi ek chul | dasis anghol thevi pani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥१॥ संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥ संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥ तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥