भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म

santacha atikram | devapuja to adharma

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥ येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्प देवा शिरीं ॥ध्रु.॥ अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥ तुका म्हणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥३॥