भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत आले घरा । तों मी अभागी दातारा

sant ale ghara | ton mi abhagi datara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥ कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥ काया कुरवंडी । करुन ओंवाळून सांडी ॥२॥ तुका म्हणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥३॥