भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज

sant manitil maj | tenen vatatase laj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥१॥ तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥ गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥२॥ तुका म्हणे माया । अवरा हे पंढरिराया ॥३॥