भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥१॥ सुख दुःख तुज देईन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥ ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भले रे भाई जिन्हें किया चीज । अछा नहिं मिलत बीज ॥१॥ फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसऱ्याची ॥१॥ असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥ परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितोचित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपुलिया गड्या भाविकांसि ॥१॥ भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥१॥ देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥ ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१॥ नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम