भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया

bhagyavant mhanon tayan | sharan gele pandhariraya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥ तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥ भुक्तीमुक्तीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥ गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥