भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपुलिया गड्या भाविकांसि

bhag tya sukhache vankadya bobadya | apuliya gadya bhavikansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपुलिया गड्या भाविकांसि ॥१॥ भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि॥ध्रु.॥ काला करूनियां वांटिती सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥२॥ खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्ती कवणाचें ॥३॥ कवणाचें चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य झाले ॥४॥