भजनी मालिका
← भजनांकडे परत

भला म्हणे जन । परि नाहीं समाधान

bhala mhane jan | pari nahin samadhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भला म्हणे जन । परि नाहीं समाधान ॥१॥ माझें तळमळी चित्त । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥ कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥२॥ तुका म्हणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥३॥