भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसिंधूचें हेंचि तारूं । मज विचारूं पाहातां

bhavasindhuchen henchi tarun | maj vicharun pahatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भवसिंधूचें हेंचि तारूं । मज विचारूं पाहातां ॥१॥ चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥ माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥२॥ तुका म्हणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥३॥