भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत

bhagyavant amhi vishnudas jagin | abhang prasangin dhairyavant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१॥ नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥ प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥२॥ आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरेचि ॥३॥ वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥४॥ तुका म्हणे भक्तजनांची माउली । करील साउली विठ्ठल आम्हां ॥५॥