भजनी मालिका
← भजनांकडे परत

भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी

bhalyachen karan sangaven svahit | jaisi kale nit apanasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥ परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितोचित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥ वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥२॥ तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥३॥