विटिया दांडू मांडिती खेळा । मेळवूनि मेळा संवगडियांचा
vitiya dandu manditi khela | melavuni mela sanvagadiyancha
विटिया दांडू मांडिती खेळा । मेळवूनि मेळा संवगडियांचा ॥१॥ सुं म्हणोनियां मारिती टोला । हांसती त्याला डाव घेतां ॥२॥
vitiya dandu manditi khela | melavuni mela sanvagadiyancha
विटिया दांडू मांडिती खेळा । मेळवूनि मेळा संवगडियांचा ॥१॥ सुं म्हणोनियां मारिती टोला । हांसती त्याला डाव घेतां ॥२॥
vitevari kaivalyagabha | rahilya ubha pandhariye
विटेवरी कैवल्यगाभा । राहिल्या उभा पंढरिये ॥१॥ आलियासी देतो धणी । सर्वां गुणीं संपन्न हा ॥२॥
vitho lavanyachi rashi | jananayanasi pahuneru
विठो लावण्याची राशी । जननयनासी पाहुणेरु ॥१॥ पाहतिया तटस्थ लागे । फिरोंचि मागें विसरती ॥२॥
vithoji krupecha sagar | dinabandhu karunakar
विठोजी कृपेचा सागर । दीनबंधु करुणाकर ॥१॥ म्हणोनियां स्तवित संत । होऊनि याचे चरणीं रत ॥२॥
vithoba vithoba namochchar god | sare yethen chad sakalikanchi
विठोबा विठोबा नामोच्चार गोड । सरे येथें चाड सकळिकांची ॥१॥ गात्य आईकत्या एकचि नव्हाभ्र । वैकुंठ राउळीं वसावया ॥२॥
viththal kenen magempudhen | piken ughaden suravadik
विठ्ठल केणें मागेंपुढें । पिकें उघडें सुरवाडिक ॥१॥ एक ते घेती देती एक । तरि हें अधिक् भरलेंसे ॥२॥
viththal namacha pratap | lesh uron nedi pap
विठ्ठल नामाचा प्रताप । लेश उरों नेदी पाप ॥१॥ त्रिविधतापांची बोहरी । विठ्ठल नामाच्या उच्चारीं ॥२॥
viththal namen vahe tali | bahamanandachya kallolin
विठ्ठल नामें वाहे टाळी । बहमानंदाच्या कल्लोळीं ॥१॥ निजात्मसुखाचा सोहभ । विठ्ठल अवलोकिती डोळां ॥२॥
viththal namen viththal jhale | dehabhava visaruni gele
विठ्ठल नामें विठ्ठल झाले । देहभावा विसरुनि गेले ॥१॥ सर्व काळ विठ्ठल चित्तीं । बहमानंदें ते डुल्लती ॥२॥
viththal nahin jya thauka | paramarthachi tyacha latika
विठ्ठल नाहीं ज्या ठाउका । परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥ करितो तें पोटासाठीं । बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥
viththal murti pahatan dithin | palati koti papanchya
विठ्ठल मूर्ति पाहतां दिठीं । पळती कोटी पापांच्या ॥१॥ मग तो आविर्भवे अंतरीं । दिसे बाहेरी चहूंकडे ॥२॥
viththal viththal mhanatan vache | svarup tyachen athave
विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे । स्वरुप त्याचें आठवे ॥१॥ शामसुंदर कटीं कर । रुप मनोहर तेजस्वी ॥२॥
viththal viththal mhanoni chhanden | bramhananden nachen
विठ्ठल विठ्ठल म्हणोनी छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥ धरुनियां दृष्टीपुढें । रुप चोखडें सुरेख ॥२॥
viththal viththal vadatan vani | chakrapani santoshe
विठ्ठल विठ्ठल वदतां वाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥ म्हणोनियां लाहो करा । अहो अवधारा अवघेहि ॥२॥
vidayamanen garvatatha | dharuni pratishtha vadhaviti
विदयामानें गर्वताठा । धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥ नेणती जेणें देव हातीं । लागे ते युक्ति हारविली ॥२॥
vinanti majhi ekin aika | aho pundalika mahamuni
विनंती माझी एकीं ऐका । अहो पुंडलिका महामुनी ॥१॥ ठाव दयावा चरणांपाशीं । मज विठोबासी विनवुनी ॥२॥
viyogachya du:khen | alavito karuna mukhen
वियोगाच्या दु:खें । आळवितो करुणा मुखें ॥१॥ कृपावंते माझे आई । धांव घालीं वो विठाई ॥२॥
vishva avaghen mayabhas | maya brahamin nahinchi mos
विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस ॥१॥ जेविं वन्हि सूर्यकांतीं । प्रगटतां कीर्ण त्या नेणति ॥२॥
vishvas antarincha janoni | nam theva majhaya vadanin | rup manache asanin | krupa karuni baisava
विश्वास अंतरींचा जाणोनी । नाम ठेवा माझया वदनीं । रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ करीन तैसी घ्यावी सेवा । विश्वास पालटों न दयावा ॥ आईका विनविलें तें देवा । अहो पंढरीनिवासा ॥२॥
vishvas majha jatan kara | vishvambhara payapen
विश्वास माझा जतन करा । विश्वंभरा पायापें ॥१॥ मग मी तुम्हां न वजे दुरी । ठेवीन वरी जीवभाव ॥२॥