भजनी मालिका
← भजनांकडे परत

वियोगाच्या दु:खें । आळवितो करुणा मुखें

viyogachya du:khen | alavito karuna mukhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वियोगाच्या दु:खें । आळवितो करुणा मुखें ॥१॥ कृपावंते माझे आई । धांव घालीं वो विठाई ॥२॥ देऊनियां भेटी । आतां अवलोकावें दिठी ॥३॥ निळा म्हणे प्रेमपान्हा । पाजी लावूनियां स्तना ॥४॥