भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनंती माझी एकीं ऐका । अहो पुंडलिका महामुनी

vinanti majhi ekin aika | aho pundalika mahamuni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विनंती माझी एकीं ऐका । अहो पुंडलिका महामुनी ॥१॥ ठाव दयावा चरणांपाशीं । मज विठोबासी विनवुनी ॥२॥ अंगिकारा रंका दीना । विज्ञापना हे माझी ॥३॥ निळा म्हणे सांभाळावें । मज हें दयावें वरदान ॥४॥