भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल नामें विठ्ठल झाले । देहभावा विसरुनि गेले

viththal namen viththal jhale | dehabhava visaruni gele

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विठ्ठल नामें विठ्ठल झाले । देहभावा विसरुनि गेले ॥१॥ सर्व काळ विठ्ठल चित्तीं । बहमानंदें ते डुल्लती ॥२॥ विठ्ठल ध्यानीं मनीं जनीं । विठ्ठल लोचनीं चिंतनीं ॥३॥ निळा म्हणे भोगी त्यागीं । विठ्ठल तया जडला आंगीं ॥४॥