भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस

vishva avaghen mayabhas | maya brahamin nahinchi mos

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस ॥१॥ जेविं वन्हि सूर्यकांतीं । प्रगटतां कीर्ण त्या नेणति ॥२॥ शुक्तिका प्रसवें मुक्ताफळ । जळींचें परि त्या नेणेचि जळ ॥३॥ निळा म्हणे धूम्री वन्हीं । नाहींचि तयातें प्रसवोनी ॥४॥