भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वास अंतरींचा जाणोनी । नाम ठेवा माझया वदनीं । रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा

vishvas antarincha janoni | nam theva majhaya vadanin | rup manache asanin | krupa karuni baisava

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विश्वास अंतरींचा जाणोनी । नाम ठेवा माझया वदनीं । रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ करीन तैसी घ्यावी सेवा । विश्वास पालटों न दयावा ॥ आईका विनविलें तें देवा । अहो पंढरीनिवासा ॥२॥ माझिये बुध्दीसी धैर्य दयावें । सेवेसी इंद्रियां राबवावें ॥ आपुलिये कीर्तनीं राखावें । प्रेम माझें सर्वदा ॥३॥ गर्व अभिमान दवडावा । आळस निद्रा परती ठेवा । विसर तुमचा न पडे देवा । देई सेवा हें दान ॥४॥ निळा म्हणे कृपासिंधु । तुम्ही साचार दीनबंधु । आहा म्हणोनि घेतला छंदु । येवढें आर्त पुरवावें ॥५॥