भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

लाटिक्या भूताची लटिकी भूतबाधा । झाली करवी खेदा जाणतिया ॥१॥ तैसें तुम्हां केलें माझिया संचितें । देवपणहि थितें ही रचिलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लाभ अथवा हानी करितां व्यवसाय । आम्हां कते विपाय फळां आले ॥१॥ एका लाभा पात्र केलें तिहीं लोकीं । आम्हां नेलेंशेखीं ऐशा थरा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लोक सकळहि बाहेरी येती । तंव निर्मळ गगन शुध्द गभस्ती । नवा चारा धेनुवा चरती । आणि दुभती यथेष्ट ॥१॥ तंव गडी अवघे मस्तकावरी । धरुनियां होते गिरी । गर्वारुढ ते अंतरीं । आम्ही पर्वत उचलिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लोभियानें धन केलें भूमिगत । दगडही थित घालूनी वरी ॥१॥ तैसे तुम्हीं देवा केलें आपणांसी । कळंक यशासी लावियला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वणिंतां चरित्रे न पुरे धणी । वाचा लांचावली हरीच्या गुणीं । स्वानंदाची उघडली खाणी । नामस्मरणीं मातली ॥१॥ अधिक् अधिक् स्फूर्तीचा प्रसर । आगळीं अक्षरें चालती फार । नेणों फुटलें हें चिदांबर । मेघवृष्टिन्यायें होतसें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वत्सें वत्सप वनांतरी । माजी परमात्मा श्रीहरी । खेळतां खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला ॥१॥ सांगतां अंगीची बारव । मृणालिके ऐसी लव । शृंगे सुवर्णाची ठेव । रत्नापरी नयन दोन्ही ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वदन निमासुरें कटांवरीं कर । उभा विटेवरीं पुंडलिका समोर । चरणीं ब्रीदावळी रुळती असूर । वरी वाळे वांकी रुणझुणिती मधुर वो ॥१॥ तेणें नवलचि केलें वो साजणी । सहज अवलोकितां संचारला नयनीं । त्याविण न दिसेचि दुजें जनीं वनीं । जें जें दिसे तें तें हाचि भासे मनीं वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वंदूनि तुकया सद्गुरुचें चरण । बहमानंदे गर्जोनि पूर्ण । स्वानुभवभरें हांकारुन । औषध घ्या घ्या म्हणतुसे ॥१॥ निजात्मनगरीहुनी धडफुडा । वैदय आलों गा या तुमच्या चाडा ॥ तोडीन नाना व्याधींचा झगडा । करीन रोकडा अमरा ऐसा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा