भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाटिक्या भूताची लटिकी भूतबाधा । झाली करवी खेदा जाणतिया

latikya bhutachi latiki bhutabadha | jhali karavi kheda janatiya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लाटिक्या भूताची लटिकी भूतबाधा । झाली करवी खेदा जाणतिया ॥१॥ तैसें तुम्हां केलें माझिया संचितें । देवपणहि थितें ही रचिलें ॥२॥ लटिकीचि जळीं दाऊनियां छाया । झकविलें राया श्वापदाच्या ॥३॥ निळा म्हणे स्वप्नीं सिहांचें रुपडें । देखोनियां पडे मदोन्मत्त ॥४॥