भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदवी असत्याची वाणी । माजी निंदेची पुरवणी

vadavi asatyachi vani | maji nindechi puravani

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वदवी असत्याची वाणी । माजी निंदेची पुरवणी ॥१॥ जळो जळो त्याचें तोंड । पचतें पापाचेंचि कुंड ॥२॥ कुश्चळ सर्वदा अंतरीं । इतरांचिया घातावरी ॥३॥ निळा म्हणे भोगील पीडा । नर्कवासीं होउनी किडा ॥४॥