भजनी मालिका
← भजनांकडे परत

वणिंतां चरित्रे न पुरे धणी । वाचा लांचावली हरीच्या गुणीं । स्वानंदाची उघडली खाणी । नामस्मरणीं मातली

vanintan charitre na pure dhani | vacha lanchavali harichya gunin | svanandachi ughadali khani | namasmaranin matali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वणिंतां चरित्रे न पुरे धणी । वाचा लांचावली हरीच्या गुणीं । स्वानंदाची उघडली खाणी । नामस्मरणीं मातली ॥१॥ अधिक् अधिक् स्फूर्तीचा प्रसर । आगळीं अक्षरें चालती फार । नेणों फुटलें हें चिदांबर । मेघवृष्टिन्यायें होतसें ॥२॥ आवरताही नावरे मती । लिहितां न पुरे हे दिवसरातीं । न कळें काय केलें संतीं । देउनी प्रसाद आपुला ॥३॥ अवघेंचि उघडूनियां भांडार । दृष्टी दाविलें सारासार । लेववूनियां ते अलंकार । केलें समोर बोलावया ॥४॥ अक्षरें वाचे येती । ते ते प्रमेयेसीचि उठती । नेणों गुंफोनी ठेविलीं होतीं । तेचि प्रसादीं वोपिलीं ॥५॥ नाहीं वाचेसी गुंतागोवा । तात्पर्यार्थाचि हा अघवा । ऐसा योजूनियां बरवा । मुहूर्त दिधला समर्थी ॥६॥ निळा आईत्या पिठावरी । रेघा आढीत बैसला घरीं । दैव मोडोनी आलें वरी । होतें संचितीं म्हणउनी ॥७॥