भजनी मालिका
← भजनांकडे परत

वळत्या आम्हांसी पाठवी

valatya amhansi pathavi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वळत्या आम्हांसी पाठवी । त्याचा नाठवी उपकारही ॥१॥ नका येऊं देऊं संगें । लावा मागें भोवंडुनी ॥२॥ याची वोढाळें धांवती । सैरा नाटोपती तें आम्हां ॥३॥ निळा म्हणे ऐकोनी हरी त्यांचे करी समाधान ॥४॥