भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

करिती गायन रामकृष्णहरी । गोकुळींच्या नारी जाती तेथें ॥१॥ शंख नामा तेथें आलासे गुह्यक । नाहीं त्या विवेक पापि-यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करीना साधन जिवासी बंधन । कोणे काळीं मन नोहे शुद्ध ॥१॥ करूं जातां तप अभिमानरूप । त्रिविधादि ताप कैसा निवे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करील जो प्रश्र सांगेल जो कथा । श्रवण करितां उद्ध-रती ॥१॥ कथा भागिरथी स्नान जे करिती । त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करुणा बहुत तुझ्या चरणापाशीं । धांवोनि ह्लषिकेशी आलों सर्व ॥१॥ वाळुवंटीं उभे पताकांचे भार । पाहोनि शंकर वेडावला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कर्मजड मूढ पतीत पामर । भवसिंधु पार नटके जया ॥१॥ यालागीं पंढरी केली मुक्ति पेंठ । भक्तें भूवैकुंठ वसविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कलियुगीं जन मूर्ख शून्यवृत्ति । तारिसी श्रीपति नाम घेतां ॥१॥ परम पावना पवित्रा निर्मळा । भक्ताचा सांभाळ करीं देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कलीचिये अंतीं होणार कलंकी । मारील म्लेंछ की घोडयावरी ॥१॥ करील धर्माची उभारील गुढी । कृतयुगा प्रौढी करीतोचि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कल्मष हरती जयाचेनि नामें । तें विसरोनि काय करावें ॥१॥ संसारतारक विसांवा हरि । गर्भवास चुकवी तो मुरारि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कल्याणींचा सिंपी हरिभक्त गोमा । त्याची कांता उमा नरहरिभजनीं ॥१॥ सरिता सुकृताची त्या पोटीं उत्पन्न । जाली संबोधन गोणाबाई ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कळवळी मन नाहीं देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे जाले ॥१॥ संत साधुजन होत कासाविसी । आले सामाधीपाशीं तांतडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कळावंताच्या कळाकुसरी । त्या मी नेणें ना श्रीहरी ॥१॥ वारा धांवे भलत्या ठायां । तैसी माझी रंग छाया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कंसा हातीं विडा पाहे चहूंकडा । पूतन त्या पुढां काय बोले ॥१॥ जाईन गोकुळा वधीन त्या बाळा । ऐसी त्या चांडाळा बोलतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कंसाचिया घरा आला नारदमुनी । एकांतीं बैसोनी सांगतसे ॥१॥ सातवा जो गर्भ जिराला ह्मणती । रोहिणी प्रस-वती बळीराम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कंसासुर सारे करोनि विचार । धाडती अकूर गोकु-ळासी ॥१॥ अकुरा आनंद झाला असे फार । पाहीन श्रीधर डोळे-भरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कंसें पाठविला आला तृणावर्त । धुळीनें समस्त व्यापि-येलें ॥१॥ दुष्टबुद्धि तेव्हां उचली देवासी । धरियेलें त्यासी कंठीं देवें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव