भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुनियां स्नान । वस्रें घेतलीं नूतन

karuniyan snan | vasren ghetalin nutan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करुनियां स्नान । वस्रें घेतलीं नूतन ॥१॥ पाचारा ब्राह्मण । श्रृगारावें देवसदन ॥२॥ बाहा बाहा दशग्रंथी । त्यासी सांगां आणा पोथी ॥३॥ त्वरें बाहारे ज्योतिषी । नंद करी जातकासी ॥४॥ केलें देवतार्चन । द्विज सांगती तर्पण ॥५॥ फार त्याला मुख । पाहे कृष्णाजीचें मुख ॥६॥ करी पुण्याहवाचनें । नामा ह्मणे आनंदानें ॥७॥