भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलीचिये अंतीं होणार कलंकी । मारील म्लेंछ की घोडयावरी

kalichiye antin honar kalanki | maril mlenchh ki ghodayavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कलीचिये अंतीं होणार कलंकी । मारील म्लेंछ की घोडयावरी ॥१॥ करील धर्माची उभारील गुढी । कृतयुगा प्रौढी करीतोचि ॥२॥ तोंवरी साधन हरिनाम कीर्ति । संतांची संगती नामा म्हणे ॥३॥