भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसें पाठविला आला तृणावर्त । धुळीनें समस्त व्यापि-येलें

kansen pathavila ala trunavarta | dhulinen samasta vyapi-yelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कंसें पाठविला आला तृणावर्त । धुळीनें समस्त व्यापि-येलें ॥१॥ दुष्टबुद्धि तेव्हां उचली देवासी । धरियेलें त्यासी कंठीं देवें ॥२॥ यशोदा पाहात न दिसे श्रीकृष्ण । ऊर बडवून शोक करी ॥३॥ गौळणींचा मेळा मिळाला समस्त । कोणी कृष्णनाथ नेला सयें ॥४॥ न लगे घरदार बुडाला संसार । दावा गे श्रीधर तान्हें माझें ॥५॥ ठावें असतें ऐसें बांधित्यें पोटासीं । कोठेम गुंतलासी बाळा माझ्या ॥६॥ धांवा गे धांवण्या पाहा गे लेंकरूं । शोक अनिवारू करीतसे ॥७॥ शिणल्या भागल्या येतों तुह्यां घरा । मुख हें उदारा दावीं कृष्णा ॥८॥ सांडूं पाहे प्राण यशोदा सुंदरी । हंबरडा मारी वत्सालागीं ॥९॥ चेपोनी नरडें गतप्राण केला । भूमीसीं पाडिला दैत्य तेव्हां ॥१०॥ नामा ह्मणे वरी खेळत गोविंद । पाहोनी आनंद सकळांसी ॥११॥