भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसासुर सारे करोनि विचार । धाडती अकूर गोकु-ळासी

kansasur sare karoni vichar | dhadati akur goku-lasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कंसासुर सारे करोनि विचार । धाडती अकूर गोकु-ळासी ॥१॥ अकुरा आनंद झाला असे फार । पाहीन श्रीधर डोळे-भरी ॥२॥ आजी होईल माझ्या जन्माचें सार्थक । वैकुंठनायक पाहीन मी ॥३॥ उजवे जाती काक वाम जाती मृग । पाहीन श्रीरंग स्वामी माझा ॥४॥ शुभ हे शकुन मार्गीं हे होताती । पाहीन भूपती वैकुंठींचा ॥५॥ येथूनियां माझी सरली येरझार । कंसानें उपकार केला मोठा ॥६॥ आजी माझे पितर उद्धरती सकळ । पाहींन गोपाळ कृपासिंधु ॥७॥ नामा ह्मणे आला गोकुळासन्निध । ह्लदयीं आनंद न समाये ॥८॥