भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुणा बहुत तुझ्या चरणापाशीं । धांवोनि ह्लषिकेशी आलों सर्व

karuna bahut tujhya charanapashin | dhanvoni hlashikeshi alon sarva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करुणा बहुत तुझ्या चरणापाशीं । धांवोनि ह्लषिकेशी आलों सर्व ॥१॥ वाळुवंटीं उभे पताकांचे भार । पाहोनि शंकर वेडावला ॥२॥ सूर्य चंद्रादिक घालिती लोटांगण । करी प्रदक्षिणा स्वयें गंगा ॥३॥ नामा ह्मणे ऐसें सांगतां बहुत । वेदशास्त्र ग्रंथ ठकावले ॥४॥