भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

जिकडे जावें तिकडे देवाचि सांगातें । ऐसें केलें नाथें पंढरीच्या ॥१॥ शब्द तिथें झाला समूळचि वाव । गेला देहभाव हारपोनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जिता मायबापा न घालिती अन्न । मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ॥१॥ पहा पहा संसारींचा कैसा आचारु । जिता अबोला मा मेल्या उच्चारु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जिव्हा रस चाखी अवलोकी नेत्र । प्रेरक पवित्र आत्माराम ॥१॥ बोलतसे मुख त्वचे कळे स्पर्श । प्रेरक परेश आत्माराम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जीं जीं भक्त बोलतीं वचनें । तीं तीं प्रमाण करणें देवा ॥१॥ याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जीव शिव दोन्हीं एकचि आसनीं । पूजी अवसानीं सर्वकाळ ॥१॥ कामक्रोध यांचा मानूनि विटाळ । पूजन सर्वकाळ बरें होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जीवभाव जेणें अर्पियला देवा । तयाची ते सेवा देव करी ॥१॥ न म्हणे नीच अथवा उंचपण । भावासी कारण मुख्य देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जीवाचें जीवन जनीं जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देहीं ॥१॥ वाउगी कां वायां शिणती बापुडीं । काय तया जोडी हातीं लागे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जीहीं जाणितलें वर्मासी । त्याचें दास्य करिसी । गर्भवास सोसिशी । त्याचें साठी ॥१॥ घर कुंटुंब ना आभावो । गांव न तुज ठावो । सोलाट तुं पाहा हो । लागला जगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें कर्म करावें या देहीं । भोगावें तेंही देहादेह ॥१॥ देहींचें कर्म देहींच भोगावें । वायां कां शिणावें हाव भरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें क्षेत्र जें जें स्थळीं । तें तें बळी आपुलें ठायीं ।१॥ परे ऐसें माहात्म्य नाहीं कोठें । जें प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरुप । पुजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥ वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें देखिलें तें तें भगलें । रुप एक उरलें विटेवरी ॥१॥ डोळियाची धनी पाहतां पुरलीं । परी वासना राहिली चरणाजवळील ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ