भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवभाव जेणें अर्पियला देवा । तयाची ते सेवा देव करी

jivabhav jenen arpiyala deva | tayachi te seva dev kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जीवभाव जेणें अर्पियला देवा । तयाची ते सेवा देव करी ॥१॥ न म्हणे नीच अथवा उंचपण । भावासी कारण मुख्य देवा ॥२॥ देव भावासाठीं लागे पाठोपाठीं । एका जनार्दनीं भेटी देतो देव ॥३॥