भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिकडे जावें तिकडे देवाचि सांगातें । ऐसें केलें नाथें पंढरीच्या

jikade javen tikade devachi sangaten | aisen kelen nathen pandharichya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जिकडे जावें तिकडे देवाचि सांगातें । ऐसें केलें नाथें पंढरीच्या ॥१॥ शब्द तिथें झाला समूळचि वाव । गेला देहभाव हारपोनी ॥२॥ अंतरी बाहेरी एकमय जाहलें । अवघें कोंदटलें परब्रह्मा ॥३॥ एका जनार्दनीं ऐसी जाहली वृत्ती । वृत्तीची निवृत्ति चिदानंदीं ॥४॥