भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीहीं जाणितलें वर्मासी । त्याचें दास्य करिसी । गर्भवास सोसिशी । त्याचें साठी

jihin janitalen varmasi | tyachen dasya karisi | garbhavas sosishi | tyachen sathi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जीहीं जाणितलें वर्मासी । त्याचें दास्य करिसी । गर्भवास सोसिशी । त्याचें साठी ॥१॥ घर कुंटुंब ना आभावो । गांव न तुज ठावो । सोलाट तुं पाहा हो । लागला जगीं ॥२॥ बहुतांचें ठेवणें । बुडविलें येणें । शेख जीव घेणें । मागत्यासी ॥३॥ मायबापेंविण । वाढला हा जाण । शरण एका जनार्दनीं । जाती गोतपणें ॥४॥