भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीं जीं भक्त बोलतीं वचनें । तीं तीं प्रमाण करणें देवा

jin jin bhakta bolatin vachanen | tin tin praman karanen deva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जीं जीं भक्त बोलतीं वचनें । तीं तीं प्रमाण करणें देवा ॥१॥ याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥ भक्तवचना उणेंपण । येऊं नेदी जाण निर्धारें ॥३॥ स्वयें गर्भवास सोशी । अंबऋषीकारणें ॥४॥ एका जनार्दनीं ब्रीद साचा । वागवी भक्ताचा अभिमान ॥५॥