भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीव शिव दोन्हीं एकचि आसनीं । पूजी अवसानीं सर्वकाळ

jiv shiv donhin ekachi asanin | puji avasanin sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जीव शिव दोन्हीं एकचि आसनीं । पूजी अवसानीं सर्वकाळ ॥१॥ कामक्रोध यांचा मानूनि विटाळ । पूजन सर्वकाळ बरें होय ॥२॥ परद्रव्य परस्त्री येथें आसक्त नोहे मन । तेणें जनार्दन पूजा पावे ॥३॥ एका जनार्दनीं ममता टाकुनी । संतांचे चरणीं पूजन करी ॥४॥