भजनी मालिका
← भजनांकडे परत

जुनाट जुगादीचें नाणें । बहु काळांचे ठेवणें

junat jugadichen nanen | bahu kalanche thevanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जुनाट जुगादीचें नाणें । बहु काळांचे ठेवणें । पुंडलिकांचे पायाळपणें । उभें ठेलें विटेवरी ॥१॥ युगें जाहलीं अठ्ठवीस । वास भीवरेतीरास । भक्तांची धरु आस । विटे उभा राहिला ॥२॥ एका जनार्दनीं भाव । तया भेटतसे देव । अभागीये भेव । सदा वसे अंतरीं ॥३॥