भजनी मालिका

भजने

आयुष्याच्या अंतीं । राम म्हणतां वक्त्रीं । ते नर सेविती मुक्ती । संदेह नाहीं ॥१॥ हात पाय सिद्ध आहे । तंव तूं तीर्था जाये । तीर्थाचें मूळ पाहे । राम जप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आरुपीं रुपाचा विस्तार । अगुणीं गुणांचा श्रृंगार । अनामीं नामांचा बडिवार । सहस्त्रावरी विराजला ॥१॥ नाहीं अवतारा मर्यादा । अपार गुणांची संपदा । केलीं चरित्रें सच्चिदानंदा । कोण वर्णितां पुरेल ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥ करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आई ॥१॥ देई गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेती नाहीं ॥१॥ काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आरोहण ज्याचें नंदीवरी । वामांकी शोभे गिरिजां नारी ॥१॥ त्रिशुळ डमरु शंख कपाल । मस्तकी गंगा चंद्रभाळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥१॥ होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां ॥१॥ आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी निजभजनें निरंजन होतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ