भजनी मालिका
← भजनांकडे परत

आरंभी आवडी आदरें आलें नाम

arambhi avadi adaren alen nam

आरंभी आवडी आदरें आलें नाम । तेणें सकळ सिध्दि जगीं जालें पूर्ण काम ॥१॥ रामकृष्ण गोविंद गोपाळा । तूं माय माउली जिवीं जिव्हाळा ॥२॥ तुझियेनि नामें सकळ संदेहो फ़िटला । बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥