भजनी मालिका
← भजनांकडे परत

आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ती

artabhutamprati | uttam yojavya tya shakti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ती ॥१॥ फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु.॥ अल्पें तो संतोषी। स्थळीं सांपडे उद्देसीं ॥२॥ सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥३॥