भजनी मालिका
← भजनांकडे परत

आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं

arush majhi vani bobadin uttaren | keli te lekuren salagi payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥ करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥ आधारें वदली प्रसादाची वाणी । उिच्छष्टसवणी तुमचिया ॥२॥ तुका म्हणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥३॥