भजनी मालिका
← भजनांकडे परत

आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें

artabhutan dyaven dan | kharen punya tya nanven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥१॥ होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धी ॥ध्रु.॥ सत्य संकल्प चे साटीं । उजळा पोटीं रविबिंब ॥२॥ तुका म्हणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥