भजनी मालिका
← भजनांकडे परत

आयुष्याच्या अंतीं । राम म्हणतां वक्त्रीं । ते नर सेविती मुक्ती । संदेह नाहीं

ayushyachya antin | ram mhanatan vaktrin | te nar seviti mukti | sandeh nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आयुष्याच्या अंतीं । राम म्हणतां वक्त्रीं । ते नर सेविती मुक्ती । संदेह नाहीं ॥१॥ हात पाय सिद्ध आहे । तंव तूं तीर्था जाये । तीर्थाचें मूळ पाहे । राम जप ॥२॥ नको जप माळा कांहीं । उगाच बैसे एके ठायीं । हृदयीं दृढ ध्याई । राम नाम ॥३॥ ऐसे घेई पा उपदेश । नको करुं वाउगा सोस । तेणें होय नाना क्लेश । जन्म यातना ॥४॥ हेंचि तुज सोपे वर्म । येणें तुटे कर्माकर्म । एका जनार्दनीं श्रम । सर्व नासे ॥५॥