भजनी मालिका
← भजनांकडे परत

आरशाअंगींक लागतां मळ । मुख न दिसेचि निर्मळ

arashaangink lagatan mal | mukh na disechi nirmal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आरशाअंगींक लागतां मळ । मुख न दिसेचि निर्मळ ॥१॥ मळ तो झाडुनि पाहतां । सुख दिसें निर्मळता ॥२॥ पाहतां शुद्धभाव रीतीं । परमार्थ हाचि चित्तीं ॥३॥ एका जनार्दनीं हा विचार । आरशासारिखा प्रकार ॥४॥